पहिले दोन भाग लंडन मधले होते त्यामुळं तिसराही लंडन मध्ये चालू होतो. एक ज्वेलरी शॉप आहे तिथं तीन चोर येतात चोरी करतात मात्र पळून जायचा त्यांचा प्लॅन फसतो आणि त्यांना जेल होते. आता हे तिघं कोण हे चित्रपट जसा पुढं सरकतो तसं समजत जातं.
आता ओळख होते ती नायिकांची - गंगा(जॅकलिन),जमुना(लिसा),सरस्वती(नर्गिस)
यांचे पिताश्री बटुक ( बोमन इराणी )
पिताश्रींचा एक वेगळाच ट्विस्ट आहे जो पडद्यावर पाहणं उचित ठरेल.
तर बटुक च्या घराण्यात म्हणे लग्नं टिकत नसतात त्यामुळे तो आपल्या मुलींचीही लग्नं लावू इच्छित नसतो.
पण मुली तर प्रेमात पडलेल्या आहेत. आणि इथं ओळख होते ती त्यांच्या boyfriends ची म्हणजेच अक्षय, रितेश आणि अभिषेक.
अक्षय फुटबॉल प्लेअर आहे तसेच तो मानसिक रुग्ण आहे. मानसिक रुग्ण म्हणजे जर त्यानं INDIAN असा शब्द ऐकला कि तो सैरभैर होत असतो.
रितेश एक कार रेस प्लेअर आहे. आणि अभिषेक सिंगर.
आता मुलींना कसं समजावणार म्हणून बटुक मदत घेतो अखिरी पास्ताची ( चंकी पांडे ) . त्याला जोतिषी म्हणून घरी आणतो आणि काही बाही सांगतो.
मग बाप लेकींचा इमोशनल सीन....
पण मुली इतक्या प्रेम करत असतात तिघांवर सो आणतात त्यांना घरी... तिघांच्याही नजरा मुलींच्या संपत्तीवर आहेत....त्यांची हि घरातली मजा मस्ती।म्हणजे हाऊसफुल 3 .
हे सर्व काही चालू असताना येतो तो ऊर्जा भाई ( जॅकी श्रॉफ) ... आता हा ऊर्जा कोण... बटुक चा खरा चेहरा... ती चोरी केलेले तीन चोर नक्की कोण याची उत्तरं चित्रपटाच्या उत्तरार्धात मिळत जातात.
सिनेमा उत्तम झालाय. पहिले दोन भाग साजिद खान नं डायरेक्ट केले होते पण आत्ताचा हा भाग साजिद-फरहाद या दोघांनी डायरेक्ट केलाय. चित्रपट पाहण्यासाठी हा एक प्लस पॉईंट आहे. लेखक हि साजिद- फरहाद हे दोघंच आहेत...त्यांची लेखणी या वेळी जबरदस्त फिरलीय. कॉमेडी sequence तर भारीच झालेत. डायलॉग पण मस्त आहेत. Music मात्र जरा कमी पडलंय... गाणी नको वाटतात ऐकायला....
Acting चं बोलायचं झालं तर सगळ्यांनी बरं केलंय काम... अभिनेत्रींना आपलं अभिनय कौशल्य दाखवावं इतका वाव नाहीय चित्रपटात तरीही चांगलं केलाय त्यांनी. अक्षय रितेश आणि अभिषेक तिघांनी तर लई भारी कामं केलीत. मुंबई चा ऊर्जा भाई जॅकी श्रॉफ यांनी भारी पैकी सजवला आहे तर बटुक च्या भूमिकेत बोमन इराणी फिट आहेत. चंकी पांडे बद्दल आपण बोलायला नको.
फिल्म चा फर्स्ट half थोडा कंटाळवाणा आहे...उत्तरार्ध मात्र हि उणीव भरून काढतो...
दोन तास निखळ मनोरंजन , डोक्याला काही त्रास नकोय, हसून हसून टेन्शन दूर करायचं आहे , फॅमिली सोबत एखादी फिल्म बघायची आहे....असं जर तुम्ही ठरवलं असेल तर हाऊसफुल 3 हा नक्कीच चांगला ऑप्शन आहे.
Saturday, 4 June 2016
Housefull 3
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment