ज्या रमन ने 60 च्या दशकात मुंबई मध्ये दहशत माजवली होती त्या रमण वरचा हा सिनेमा नाही या पासूनच सिनेमाची सुरवात होते. सुरवातीला "त्या" रमनच्या गुन्ह्याचा थोडक्यात आढावा मिळतो आणि या चित्रपटातला रमण( नवाजुद्दीन) आपल्या समोर येतो तो एक खून करतच. चाचा नावाच्या माणसाचा तो अतिशय थंड डोक्याने खून करतो. हा चाचा म्हणजे एक ड्रग डीलर आहे. तो राघव ( विकी कौशल ) या पोलीस इन्स्पेक्टर ला ड्रग सप्लाय करत असतो. या खुनाच्या ठिकाणापासून चालू होतो रमण राघव चा प्रवास.
चित्रपट 8 भागात आपल्या समोर येत जातो. प्रत्येक भागात रमण चं रौद्र रूप वाढत जातं. पहिल्या भागात तर हा रमण स्वतःहून पोलीसाना सांगत असतो मी खून केलेत. पण याला पोलीस वेडा ठरवतात. इथंच त्यांची चूक होते. आणि चालू होते ती एका मागं एक खुनाची मालिका. रमण प्रत्येक खून हा अतिशय थंड डोक्याने करताना दाखवलाय. एकाच हत्याराने गाणं गुणगुणत रमण एका मागं एक खून करत चालला आहे. तो स्वतःला यमाचा दूत समजतो आहे. आणि त्याला पाहिजे तो एकच माणूस तो म्हणजे इन्स्पेक्टर राघव.
इन्स्पेक्टर राघव कडे या रमण ची केस आहे. राघव हा ड्रग addict आहे. इथं येतं तो चाचा च्या खुनाचा संबंध. शेवटच्या भागात रमण सापडतो पोलिसाच्या ताब्यात. आणि त्यानं केलेला खुलासा...खुनाची कारणं... त्याला राघव का हवा होता.... हे सगळं पडद्यावर पाहणं उचित ठरेल.
नवाजुद्दीन नं तर यात कमाल अभिनय केलाय. थंड डोक्याने खून करणारा रमण त्यानं ताकदीनं साकारला आहे. विकी कौशल ने हि तो ड्रग addict इन्स्पेक्टर छान पद्धतीनं उभा केलाय. कौतुक करायचं म्हणजे दिग्दर्शक अनुराग कश्यप चं. अनुराग कश्यप यांनीच चित्रपट लिहला आहे. त्यांनी निवडलेली लोकेशन्स, माणसे कुठेही खोटी वाटत नाहीत. आठ भागात चित्रपट असला तरी चित्रपट ट्रॅक सोडत नाही. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात अनुराग कश्यप सफल झालेत.चित्रपटात गाण्यांना तितकासा वाव नाही. पण बॅकग्राऊंड music भारी जमलय. आणखीन एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटातले संवाद...... संवाद देखील खूप भारी आहेत. आणि नवाजुद्दीन ने ते ज्या प्रकारे म्हटले आहेत ते कमाल आहेत.
अश्या या रमण राघव ज्या जोडीला एकदा भेटायलाच पाहिजे. दोन तास नुसता रक्तरंजित थरार.
©gsumitt
Sunday, 26 June 2016
रमण राघव 2.0
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment