Friday, 3 June 2016

सैराट

सैराट चा सेन्सॉर certificate आलं आणि एकच दंगा चालू झाला talkies मध्ये.....शिट्या नुसत्या.....
Finally चालू होतो सिनेमा तो म्हणजे क्रिकेट च्या match पासून.....match चालू असताना आपल्याला ओळख होते ती परश्याची....फिल्म चा हिरो.....स्लो मोशन मध्ये जातो तो अरची च्या घरी तिला बघायला.... बघतो हसतो नाचतो....आणि जातो match खेळायला परत....अरची ला बघितल्यामुळे एका जोशात match जिंकवून देतो टीम ला.....
Match झाली मग clg मधले प्रसंग....विहारीवरचे प्रसंग.....एकमेकांना चिट्ठी पाठवणे....परश्या ला होणारी मित्रांची मदत....आणि finally ती त्याला I Love U म्हणते.....पुन्हा शिट्या ....टाळ्या.....
या भागा पर्यंत सिनेमा च जे चित्रीकरण झालाय ते अतिशय सुंदर आहे....लोकेशन्स भारी आहेत....
पक्षांच्या थव्याच जे चित्रीकरण झालाय ते खूप सुंदर आहे....बॅकग्राऊंड music भारी झालंय......
सगळं काही चांगला चालू असताना येतो तो प्रिन्स ( अरची चा भाऊ ) याचा वाढदिवस.... अरची परश्याला बोलावते भेटायला आणि घडतं ते सैराट....
मग काय अरची चा बाप त्याचे पंटर लोक... परश्या .... परश्याचे मित्र यांची मारामारी....अरची चा आक्रोश....परश्या वर होणारी पोलीस case .... आणि त्यांनी पळून जायचा घेतलेला निर्णय....
इथं finally interval होते....
खूप वेळ घेतलाय इंटरवल पर्यंत.......थोडा कंटाळा येतो फिल्म पाहून नाही तर नुसत्या शिट्ट्या ऐकून....
2nd half चालू होतो तो आंध्र प्रदेश मध्ये....
पहिला भाग पाहून आपण आपल्या डोक्यात आता काय काय होईल याची मांडणी आखतो....आणि आपल्या मनात झालेला फुगा फटकन फुटून जातो....
या 2nd half मध्ये जर काही घडतं ते विचित्र....
दोघांचं लग्न होण्या पर्यंत ठीक होतं.... पण अरची परश्याला मुलगा होतो... हे जरा अति झालं...कारण दोघेपण आई बाप अजिबात वाटत नाहीत....
त्यांचे settle होणं जे दाखवला आहे ते खूप boring झालाय....
परश्या च अरची वर संशय घेणं.... तिला हॉटेल मध्ये मारणं.... हे नसतं दाखवलं तर चाललं असतं....
मग आता सगळं चांगलं होईल म्हणून अरची घरी फोन लावते...मग प्रिन्स अरची चा काका घरी येतात...अगदी खूप चांगला वागत असतात आपल्याला वाटत आता झालं सगळं नीट....happy ending....
पण नाही अरची कडची आलेली माणसं वेगळ्या हेतूने आलेली असतात...आपला हेतू साध्य करून ते निघतात....अरची परश्या चा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह...त्यांच्या मुलाचं रडणं....रक्ताळलेले ते लहानग्यांचे पाय....इथं हे सैराट संपतं.....
तर असा आहे सैराट...वास्तव दर्शी असला तरी शेवट उचित वाटत नाही....सगळ्याची कामं मात्र मस्त झालीत....विशेष आहे ते म्हणजे music आणि cinematography.... टिपिकल नागराज touch असलेला हा सिनेमा....अनेक scene चुकीचे वाटतात....नसते तर चांगलं वाटलं असता...
एकूण काय तर average झालाय सिनेमा.
..slow मोशन चा तर भडीमार आहे सिनेमा मध्ये...पहिल्या half जसा भावतो तसं 2nd हॉफ मध्ये वाटत नाही....अपेक्षा ठेवण्यात point नाही....
So अशी आहे अर्चना पाटील आणि प्रशांत काळे यांची ही.... फुलवलेली आणि नंतर भरकलेली लव्ह स्टोरी....
सैराट....

No comments:

Post a Comment