Friday, 3 June 2016

फोबिया

फोबिया
चित्रपटाची सुरवात होते ती एक चित्र प्रदर्शनात...जिथं चित्रकार मेहेक ( राधिका आपटे ) हिचं एक चित्र लागलं आहे. सगळे जण तिचं कौतुक करत आहेत .
तिचे मित्र जमले आहेत. ती त्यांना एक गोष्ट सांगत आहे. गोष्ट थोडी विचित्र आहे असं सगळ्यांना वाटत असतं... आता ती गोष्ट काय आहे हे स्क्रीन वर पाहणे उचित ठरेल. सगळं हसी मजाक चालू आहे तितक्यात मेहेक ला एक टॅक्सी दिसते. टॅक्सी तुन धूर येत आहे. तिला विचित्र वाटतं... तसं ती बोलून दाखवते आपल्या मित्राला शान ला... शान तिचा खूप जवळचा मित्र आहे... शान बरोबर ती टॅक्सी तुन जात असताना ती त्याला बघितलेल्या दृष्याबद्दल सांगते. शान चा विश्वास बसत नाही ... तो तिला समजावतो आणि आपल्या रस्त्यात उतरतो... पुढं टॅक्सी चालू होते... मेहेक एकटी आहे ... रात्र झालीय..अर्थातच टॅक्सी ड्राइवर चे इरादे चांगले नसतात... तो तिला कुठंतरी घेऊन जातो आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो...तिच्या प्रतिकारामुळे ते सफल होत नाही पण मेहेक एका आजाराला बळी पडते तो आजार म्हणजे ---  अगोरोफोबिया
ह्या मुळे ती कुठं घराबाहेर पडू शकत नाही... परक्यांचा स्पर्श तिला नकोस होतो...मधूनच येणारे पॅनिक अटॅक...mob ची वाटणारी भीती या मुळे तिचं आणि तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींचं जगणं मुश्किल झालाय...तिची बहीण , शान आणि ती डॉक्टर यांनाच तिच्या आयुष्यात प्रवेश...या सगल्यापासून तिची बहीण त्रस्त झालीय सो ते तिला दुसऱ्या घरात हलवतात...जिथं ती एकटी राहती आहे...हा आजार बरा होण्यासाठी तिनं स्वतःहून प्रयत्न करायला हवे असं डॉक्टर चं म्हणणं आहे...तिला ज्या घरात ठेवलं जातं ते शान च्या मित्राचं आहे... मेहेक ज्या दिवसापासून घरात येते तेव्हापासून सुरु होतात भास आभास यांचे खेळ... इथं आधी काय तरी झालंय अस वाटू लागतं तिला...आपल्या आजूबाजूला कोणी तरी आहे...कोण तरी आपल्याला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतंय..... घराबाहेर जावं तर बाहेर जाता येत नाही ...पाऊल उंबर्याबाहेर पडत नाही...अशा विचित्र अवस्थेत मेहेक अडकते...त्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या जिया खुराणा बद्दल जेंव्हा तिला समजतं तेंव्हा ती अजूनच restless होते...attack च प्रमाण वाढतं... जगण्यायाची धडपड चालू होते...तिला अनेक गोष्टी दिसत राहतात....ती याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत राहते...यात काय होतं मग... मेहेक मात करते का...जिया कोण...मेहेक बरोबर नक्की काय होतं...तिला दिसणाऱ्या गोष्टींचा नक्की अर्थ काय... हे सर्व काही पडद्यावर पाहणं उचित ठरेल.
   खरं तर खुप दिवसांनी अशी मूवी पहिला मिळाली.
या साठी डायरेक्टर चं अभिनंदन करायला पाहिजे...
पवन कृपलानी यांनी ज्या पद्धतीनं काम करवून घेतलंय ते खूप उत्तम आहे. राधिका आपटे नं तर कमाल काम केलंय... तिचे हावभाव... चेहरा खूप काही बोलून जातो...ती भित्री..आभासी जगात वावर करणारी मेहेक राधिका नं खूप चांगल्या पद्धतीनं उभी केलीय.....तिची हि घालमेल कॅमेरा मॅन नं अचूक टिपली आहे... background music एक वेगळा जीव आणता सिनेमात...पटकथा देखील ट्रॅक ला धरून आहे..कथा भरकटत नाही....हि या चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल...सगळ्या बाबतीत चित्रपट उत्तम झालाय....पण असे चित्रपट आपल्या कडे चालत नाहीत... commercial success कदाचित मिळणार नाही या सिनेमा ला मात्र कलाकृती म्हणून सिनेमा उत्तम आहे...
असे आजार झालेल्या व्यक्तींची लढाई हि समाजाशी नाही तर स्वतःशी असते हे सांगितलंय सिनेमात...
एकंदर पाहता जर तुम्हाला डोक्याला थोडा ताण देणारे, थोडं एंटरटेनमेंट कमी असणारे चित्रपट आवडत असतील तर " फोबिया " हा चांगला ऑप्शन ठरू शकतो.

No comments:

Post a Comment