सलमान ची फिल्म म्हणजे आपल्या मनात एक प्रतिमा असते. कथा हा भाग सलमानच्या सिनेमात दुय्यम भाग असतो. बरीच action असते आणि सलमान चा त्याचा स्वतःचा डान्स आणि त्या टाईप ची गाणी. असे काहीसे सलमान चे चित्रपट मध्यंतरीच्या काळात आले. सलमान चित्रपटात आहे इतकेच बस असते.... आणि सिनेमा कसाही असला तरी सलमान च्या नावावर खपून जातो.
पण बजरंगी भाईजान आला आणि हे चित्र बदलून गेलं. सलमान न एक जादू सोडली त्या सिनेमातून....त्यानं स्वतःची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. डायरेक्टर कबीर खान ची साथ त्याला नक्कीच महत्वाची होती.... आणि बजरंगी हिट झाला.... नुसता हिट नाही तर अनेक पुरस्कारांवर देखील बाजरंगीने आपली छाप सोडली.
आणि आता आला आहे "सुलतान"
"प्रो टेक" नावाची wrestling compitition चालू आहे भारतात.... पण त्याला पाहिजे तेवढी प्रसिद्धी नाही.... सो चिंतेत अडकलेले स्पॉन्सर....त्यांच्यातले वाद....त्यातून नाव येत ते "सुलतान" च .
आता सुलतान ची माहिती काढायला येतो ज्यानं प्रो टेक wrestling ज्यानं भारतात आणलं. मग आपण जातो 8 वर्ष मागे आणि मग सुलतान ची ओळख होण्यास सुरुवात होते... ओळख म्हणजे सुलतान आणि अर्फा ची लव्ह स्टोरी आहे.... अर्फा भेटते आणि सुलतान च्या आयुष्यात फरक पडतो. आणि एका सध्या cable वाल्याचा प्रवास चालू होतो पैलवान होण्याच्या दिशेने..... त्याचा हा पैलवान होण्यापासून ते वर्ल्ड चॅम्पियन होईस्तोपर्यंतचा भाग म्हणजे फिल्म चा फर्स्ट half आहे....फर्स्ट half मध्ये घडलेल्या अनेक नाट्यमय गोष्टींमुळे सुलतान wrestling सोडण्याचा निर्णय घेतो..अर्फा सुलतान ला सोडते....आता सुलतान हा निर्णय का घेतो....नेमकं असं काय घडतं कि अर्फा सुलतान ला सोडून जाते .... ते सगळं पडद्यावर पाहणे उचित आहे....
पहिल्या half चं सांगायचं झालं तर तो complete फ्लॅश बॅक आहे....सुल्तानची अर्फा ला पटवण्याची धडपड.... दोन तीन गाणी.... मधले कुस्तीचे sequence या मुळे पहिला भाग थोडा संथ आहे...
आता दुसरा भाग म्हणजे सुलतान ला " प्रो टेक" साठी तयार करण्याची मेहनत...दुसऱ्या भागात सलमान चा कोच म्हणून भेटणारा रणदीप हुडा एक surprise package आहे....रणदीप हुडा चा रोल छोटा आहे पण त्याने लई भारी काम केलंय.... त्यानं सुलतान कडून करून घेतलेली मेहनत टाळ्या आणते...मग आहे "प्रो टेक" च्या matches.... सुलतान मुळे प्रो टेक ला पुन्हा जान येते.... शो फेमस होतो.... शो बरोबर सुलतान हि पुन्हा नव्याने प्रसिद्ध होतो....सेमी फायनल मध्ये झालेल्या अपघात नंतरही सुलतान रिंग मध्ये उतरतो... कारण त्याची अर्फा पुन्हा त्याच्या कडे येते... मग आहे फायनल match चा थरार... हि match खूप भारी पद्धतीने घेतली आहे.... या साठी खरंच director चं कौतुक करायला हवं... मग काय सुलतान भाई शेवटची fight जिंकतात आणि एकच जल्लोष.... इथं सुलतान आपला निरोप घेतो...!!
ज्यानं हे सगळं घडवून आणला तो म्हणजे या सिनेमा चा writer-डायरेक्टर अली अब्बास जफर.... यांना फुल्ल मार्क्स .... खूप भारी जमवून आणलीय भट्टी....
सलमानच म्हणाल तर पुन्हा एकदा त्याने आपली शैली बदलली आहे....डायलॉग बाजी नाहीय...... इमोशन वाले scene... fighting चे सीन.... training दरम्यानचे सीन... या मधला सलमान बघायला मज्जा येते.... अनुष्का शर्मा ला तितकासा वाव नाही... पण तिने हि चांगलं काम केलंय.... music इतका खास नाहीय... पण सल्लू भाई च्या फॅन्स ला नाचवता....
थोडक्यात तुम्ही सलमान चे फॅन असाल तर हा चित्रपट म्हणजे पर्वणी म्हणायला हरकत नाही...
आणि जरी तुम्ही फॅन नाहीय तरी पण सुलतान ला पाहायला हरकत नाही...( भाई च्या फॅन्स चा दंगा सहन होत असेल तर )
आता बॉक्स ऑफिस वर सुलतान चा बोलबाला तर नक्की 3-4 आठवडे तरी....!!
Wednesday, 6 July 2016
सुलतान
Subscribe to:
Comments (Atom)